Tuesday, 13 February 2018

                                              स्वप्न 



दिवस उगवला  पूर्वेला तो घेवून सुंदर  प्रकाश 
येता काळा  ढग आढवा क्षणात बदलले आकाश 


गर्जल्या त्या विजा बोलण्यात गुंग आपसात 
अन  क्षणात  पृथिवर  त्या  येवून वरती  जातात


करुण हा कल्लोळ येतो सुसाट वारा 
आपटतात पृथिवर त्या पांढऱ्या शुभ्र गारा 



पडतात काही थेंब मातिवर येतो वास निराळा  
वास मातीचा घेवून दरवळला आसमंत निराळा 


साठून  डबकी पाण्याची मासे ही  नाचू लागले 
पाहून  रंगीबेरंगी मासे काठावरचे  बगळ े  भूक  हरवूनी  गेले 


काळा ढग निघून गेला परत पडला प्रकाश 
पांढरे शुभ्र  झाले ते  निळेभोर  आकाश 


दवबिंदु  ही  झाले  सुंदर  प्रकाश पानावर  पडुनी  
मी  ही  मोहक झालो  त्या अदा  निसर्गाच्या पाहुनी 


पाहण्यासाठी हा  निसर्ग  मी  ऊंच आकाशात गेलो 
झोपेतून जागा होताच मी  परत जमिनीवर आलो.


पडत होती अशी  स्वप्ने मी लहान  असताना 
खुप आनंदात गेले बालपन है पाऊस  बघताना 


काळ गेला वेळ  गेली ताशी स्वप्ने ही गेली निघुन 
पाडण्यासाठी अशी स्वप्ने मी झोपायचो  अधुन मधून 


भविष्यात सूर्याचे  ते प्रचंड ऊन आता  हिमनदीवर येईल 
पाहून रौद्ररुप निसर्गाचे  हे कलियुग  बुडून जाईल  




FROM -:
VAIBHAV SHINDE
KAVATHE-EKAND
MOB-8421490987

No comments:

Post a Comment