स्वप्न
दिवस उगवला पूर्वेला तो घेवून सुंदर प्रकाश
येता काळा ढग आढवा क्षणात बदलले आकाश
गर्जल्या त्या विजा बोलण्यात गुंग आपसात
अन क्षणात पृथिवर त्या येवून वरती जातात
करुण हा कल्लोळ येतो सुसाट वारा
आपटतात पृथिवर त्या पांढऱ्या शुभ्र गारा
पडतात काही थेंब मातिवर येतो वास निराळा
वास मातीचा घेवून दरवळला आसमंत निराळा
साठून डबकी पाण्याची मासे ही नाचू लागले
पाहून रंगीबेरंगी मासे काठावरचे बगळ े भूक हरवूनी गेले
काळा ढग निघून गेला परत पडला प्रकाश
पांढरे शुभ्र झाले ते निळेभोर आकाश
दवबिंदु ही झाले सुंदर प्रकाश पानावर पडुनी
मी ही मोहक झालो त्या अदा निसर्गाच्या पाहुनी
पाहण्यासाठी हा निसर्ग मी ऊंच आकाशात गेलो
झोपेतून जागा होताच मी परत जमिनीवर आलो.
पडत होती अशी स्वप्ने मी लहान असताना
खुप आनंदात गेले बालपन है पाऊस बघताना
काळ गेला वेळ गेली ताशी स्वप्ने ही गेली निघुन
पाडण्यासाठी अशी स्वप्ने मी झोपायचो अधुन मधून
भविष्यात सूर्याचे ते प्रचंड ऊन आता हिमनदीवर येईल
पाहून रौद्ररुप निसर्गाचे हे कलियुग बुडून जाईल
FROM -:
VAIBHAV SHINDE
KAVATHE-EKAND
MOB-8421490987